होमपेज › Konkan › वेंगुर्ले-दाभोली शाळा बनली १०० टक्के डिजिटल

वेंगुर्ले-दाभोली शाळा बनली १०० टक्के डिजिटल

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:47PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले : प्रतिनिधी

विज्ञान कक्षामुळे विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना सहज सोप्या झाल्या आहेत. वैज्ञानिक भाषेत आता सोप्या पद्धतीची माहिती मुलांना मिळेल ही खूप चांगली बाब आहे,असे प्रतिपादन उद्योजक सुरेश बोवलेकर यांनी केले. 

पूर्ण प्राथ.शाळा दाभोली नं.1 मध्ये डिजिटल वर्गाचे व विज्ञान कक्ष सुविधेचे श्री. बोवलेकर व सभापती यशवंत परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शतक महोत्सव समिती,व्यवस्थापन समिती, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी यांच्या आर्थिक सहकार्यांतून  ही शाळा शंभर टक्के डिजिटल बनली आहे. आशुतोष पंडित यांच्या प्रयत्नाने स्टेम लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड,चर्चगेट मार्फत आधुनिक विज्ञान कक्ष सुविधा शाळेत निर्माण झाल्याबद्दल व त्यासाठी प्रयत्न करणार्‍या पालकवर्गाचे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी कौतुक केले. 

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबुराव पेडणेकर, पं.स.उपसभापती श्रीम. स्मिता दामले,गटविकास अधिकारी  श्रीम. प्रणाली खोचरे,गटशिक्षणाधिकारी संतोष  गोसावी, सरपंच मनोहर कांदळकर, केंद्रप्रमुख प्रमोद गावडे,यांच्यासह माजी पं.समिती सदस्य बाबा राऊत, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर, ग्रा.पं.सदस्य अमित दाभोलकर पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर,महोत्सव समिती सचिव पांडुरंग सामंत, खजिनदार गुरुनाथ बांदवलकर उपस्थित होते.