Fri, Nov 16, 2018 17:11होमपेज › Konkan › राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता तेलंगणाला वेदांत चव्हाण रवाना

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता तेलंगणाला वेदांत चव्हाण रवाना

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 9:25PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय  तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरीचा वेदांत चव्हाण रवाना झाला आहे.

वेदांत चव्हाण याने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत असताना अलिबाग येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने राष्ट्रीय स्तरावर धडक मारून  35 किलो वजनी गटात 21 ते 25 डिसेंबर 2017 या काळात तेलंगणा येथे होणार्‍या राष्ट्रीय तायक्वांदो  स्पर्धेसाठी पूर्वतयारी करत असून तो स्पर्धेसाठी तेलंगणाला रवाना झाला आहे.

गेल्या वर्षातही अशीच चमकदार कामगिरी वेदांतने केली होती. राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून त्याला शासनाचे 12,500 रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. रा. भा. शिर्के प्रशालेचा हा विद्यार्थी असून एसआरके  तायक्वांदो क्लबमध्ये शाहरूख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेशराव कर्र्, सचिव लक्ष्मण के, कोषाध्यक्ष शशांक घडशी, प्रशांत मकवाना, शीतल खामकर, अक्षय पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.