Thu, Apr 25, 2019 21:47होमपेज › Konkan › भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम(व्हिडिओ)

भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम(व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

योगीयांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 40 वा पुण्यतिथी दिन रविवार 26 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. गेले चार दिवस बाबांच्या या उत्सवामुळे कणकवली नगरी भालचंद्रमय झाली आहे. रविवारी या उत्सवाला जिल्हयाच्या कानाकोपर्‍यातून भाविक भक्‍तांची  मांदियाळीच  अवतरणार आहे. 

पहाटे समाधी पूजन, काकड आरती, जपानुष्ठान त्यानंतर समाधीस्थानी मन्यसुक्‍त पंचामृताभिषेक विधी होणार आहे. दुपारी आरती, महाप्रसाद आणि भजनांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर आरती आणि रात्री भालचंद्र दशावतार  नाटयमंडळ हळवल यांचे दशावतारी नाटक होणार आहे. तरी या उत्सवाचा भाविक भक्‍तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थान अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे. शनिवारी चौथ्या दिवशी जिल्ह्यातून हजारो भाविकांनी बाबांच्या समाधी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ह.भ.प.सुहास वझे-गोवा यांचे कीर्तन झाले. या कीर्तनालाही रसिक श्रोतेगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नूतन भक्‍तनिवास शिलान्यास सोहळा 

परमहंस भाालचंद्र महाराज यांच्या 40 व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून त्यांच्या आशीर्वादाने  रविवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 या वेळेत नूतन भक्‍तनिवास शिलान्यास सोहळा माऊली महाराज वाळूंजकर(पिंपरी-पुणे) यांच्या हस्ते होणार आहे.  या सोहळयालाही सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.