Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Konkan › १०० टक्के निधी खर्च न करणार्‍या ग्रामसेवकांना नोटीसा बजावा

१०० टक्के निधी खर्च न करणार्‍या ग्रामसेवकांना नोटीसा बजावा

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:28PM

बुकमार्क करा

वैभववाडी :प्रतिनिधी 

ग्रामपंचायतींना 14 वा. वित्त आयोगातून मिळालेला निधी वेळेत 100 टक्के खर्च झाला पाहिजे. जर निधी वेळेत खर्च झाला नाही, तर त्या ग्रा.पं.ला परत निधी मिळणार नाही. ज्या ग्रामसेवकांनी निधी खर्च केला नाही तर त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या, असा आदेश उप मुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी गटविकास अधिकारी यांना दिला आहे.   वैभववाडी पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी तालुक्यातील ग्रा.पं. निहाय 14 वित्त आयोगातून मिळालेला निधी व आतापर्यंत खर्च झालेला निधी याचा आढावा घेतला. जि.प.अध्यक्षा रेश्मा सावंत, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जि.प.सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ , पं.स.सदस्य अरविंद रावराणे, आक्षता डाफळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील, जि.प.कार्यकारी अभियंता खांडेकर, पाताडे, हेडाव तसेच खातेप्रमुख, ग्रामसेवक सरपंच आदी उपस्थितीत होते.

ज्या ग्रामपंचायतीची घरपट्टी वसुली 70 टक्के पेक्षा कमी झाली आहे.  त्या ग्रामसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव करा. त्यांना नोटीस द्या. अन्यथा विस्तार अधिकार्‍यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. घरपट्टी, पाणी पट्टी वसुली ही ग्रा. पं. ची बेसिक कामे आहेत. ती झालीच पाहीजे.  कामचुकारपणा करणार्‍यांची  गय करणार नाही. 14 वा. वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात कामाची अंदाजपत्रक वेळेत मिळाली नाही. त्यामुळे निधी खर्च होण्यात अडचणी आल्याचे सर्वच ग्रामसेवकांनी सांगितले. कामांची अंदाजपत्रक येत्या आठ दिवसांत पूर्ण करुन देण्याची सूचना त्यांनी शाखा अभियंता यांना दिली आहेत. तसेच यावेळी ग्रामपंचायत डेटा ऑपरेटरच्या मानधनाबाबत त्यांनी ग्रामसेवक व ऑपरेटर तसेच सरपंचाना माहीती दिली. ग्रामसेवकांनी काम करताना नियमानुसार काम करावे. कोणीही सांगितले तरी नियमबाह्य काम करु नका, असेही बजावले.  कुर्ली ग्रा.पं. मध्ये काम न करताच पैसे काढल्याचे निदर्शनास येत आहे.  याबाबत संबंधितावर कारवाई करावी.  यासाठी गुन्हा दाखल करावा.  आसे रणदिवे यांनी सांगितले.