Tue, Jul 23, 2019 13:23होमपेज › Konkan › कामे वेळेत न करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

कामे वेळेत न करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:22PM

बुकमार्क करा

वैभववाडी :प्रतिनिधी 

तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे एकाच ठेकेदाराच्या नावावर आहेत.  त्यामुळे सर्व कामे रखडलेली आहेत.  जर हा ठेकेदार काम करीत नसेल तर त्याच्यावर नियमप्रमाणे दंडात्मक कारवाई करा.  त्याचे नाव काळ्या यादीत टाका. अशी सूचना जि.प.अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी केली.

वैभववाडी पंचायत समिती पाणी टंचाई आढावा बैठकीत सावंत बोलत होत्या.  यावेळी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, जि.प.सदस्य सुधीर नकाशे , पल्लवी झिमाळ, पं.स,सदस्य अरविंद रावराणे , अक्षता डाफळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.पाटील, उपकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जि.प.बांधकाम कार्यकारी अभियंता श्री.खांडेकर, गटविकास अधिकारी डाँ. सापळे,  ग्रामीण पाणी पुरवठा  अभियंता पाताडे , हेडाव आदी उपस्थितीत होते.  

पाणी पुरवठा योजना पाणी पुरवठा समिती व ग्रा.प.ने पूर्ण करुन घ्यायच्या आहेत.  जर ठेकेदार काम करीत नसेल तर त्याच्यावर कारवाई करावी.  याबाबत ग्रा.प.ने आपल्याकडे अर्ज द्यावे.  
 त्यांच्यावर काय कारवाई करायची ते बघू.  तसेच सर्व ग्रा.प.ने आपली पाणी पुरवठा योजनांची आँडीट डिसेंबर अखेर पूर्ण करुन घ्या.  अन्यथा ती कामे रद्द होतील.  यावेळी प्रत्येक ग्रा.प.निहाय पाणी पुरवठा योजनांचा ग्रामसेवक , सरपंच यांच्याकडून आढावा घेण्यात आला.  व ती कामे पूर्ण होण्याबाबत सूचना दिल्या.   यावेळी उपस्थितीत सरपंचानी आपले याबाबतचे म्हणणे मांडले.