Thu, Jan 24, 2019 07:42होमपेज › Konkan › आखवणे, मौदे परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

आखवणे, मौदे परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

Published On: Mar 15 2018 10:52PM | Last Updated: Mar 15 2018 9:41PMवैभववाडी : प्रतिनिधी

तालुक्यात बुधवारी सायंकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. तर हेत, आखवणे, मौंदे , मांगवली परिसराल पावसासह चक्रीवादळचा तडाखा बसला. यामध्ये अनेक घरे, गोठे यांचे अंशतः नुकसान झाले. तसेच हेत ते आखवणे रस्त्या लगतची झाडे मोडून वीज वाहिन्यांवर पडली. त्यामुळे मेन लाईनचे चार सिमेंटचे खांब मोडून पडले. तर एक लोखंडी पोल पूर्णपणे वाकला.  वीज वाहिन्या तुटल्यामुळे आखवणे, भोम , मौंदे परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. आखवणे येथील ग्रामदैवत श्री धाकुबाई  देवालयाची कौले वादळाने उडून गेल्यामुळे नुकसान झाले. हेत शेवरी फाटा येथील प्रवाशी निवारा शेडचे पत्रे उडाले आहेत.

 जांभवडे येथील शंकर पांडू धावले, स्वप्नाली सुरेश नागप,  जगन्नाथ पुतळाजी नागप, भोम येथील सत्यवती रामचंद्र सावंत यांच्या घराचे तर  वि.म.भोम शाळेच्या छपरावर आंब्याची फांदी पडून किरकोळ नुकसान झाले. हनुमंत पांचाळ, जगदीश डिके, चंद्रकांत नारकर, दिगंबर संसारे, शांताराम सुतार, डॉ. निकम, बाबाजी रामाणे सर्व मांगवली यांच्या घराचे किरकोळ नुकसान झाले आहे. 
या वादळी पावसाने ऐन बहरात आलेल्या काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून , आंबा व काजू बागांचा कृषी विभागाने पंचनामा करावा,  अशी मागणी शेतकरी करीत आहेत.