Sun, Apr 21, 2019 04:36होमपेज › Konkan › सदाहरित शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा : रवींद्र मडगावकर

सदाहरित शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा : रवींद्र मडगावकर

Published On: Jul 02 2018 1:44AM | Last Updated: Jul 02 2018 12:34AMसावंतवाडी : शहर वार्ताहर

हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांचे जीवनचरित्र आजच्या काळातही शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी आहे. शेतकर्‍यांनी निव्वळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता सदाहरीत शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन घ्यावे, असे प्रतिपादन पं.स. सभापती रवींद्र मडगावकर यांनी केले.

सावंतवाडी तालुका स्तरीय कृषी दिन व शेतकरी मेळावा निरवडे येथील जि.प. शाळेच्या सभागृहात रविवारी झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर उपसभापती सौ. निकिता सावंत, गटविकास अधिकारी गजानन भोसले, जि. प.सदस्य उत्‍तम पांढरे, पं.स.सदस्य पंकज पेडणेकर, अक्षया पडते, श्रृतिका बागकर, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत, माजी सभापती प्रियांका गावडे, प्रकाश परब, प्रमोद गावडे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, सुप्रिया कोरगावकर तसेच मान्यवर उपस्थित होते.

उपसभापती निकिता सावंत म्हणाल्या, शेतकरी हा समाजाचा पोशिंदा आहे. त्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. येथील शेतकर्‍यांनी कृषी विषयक सोयीसुविधांचा योग्य तो वापर करुन तसेच जास्तीत जास्त क्षेत्र पिकांखाली आणून उत्पादन वाढवावे, असे आवाहन केले. उत्‍तम पांढरे, पंकज पेडणेकर, डॉ. प्रसाद देवधर यांनीही मार्गदर्शन केले. \कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या अभियानाचा शुभारंभ यावेळी वृक्षारोपणाने करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाकडून पुरवठा करण्यात आलेली विविध झाडांच्या रोपांचे वितरण शेतकर्‍यांना करण्यात आले. कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या शेतकर्‍यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, पंंचायत समिती तसेच कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.