Thu, Apr 25, 2019 03:24होमपेज › Konkan › गुहागरमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग 

गुहागरमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग 

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:16PMगुहागर : प्रतिनिधी 

मुंबई येथील जलवर्धिनी संस्थेच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबविण्यात येत आहे. गुहागर तालुक्याच्या ग्रामीण भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून यावर्षी तालुक्यात 17 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यातून 2 लाख 50 हजार लिटर पावसाचे पाणी साठविण्यात येणार आहे. 

कोकणात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र हे पाणी नद्या-नाल्यातून समुद्राला जाऊन मिळते. यामुळे दरवर्षी येथे पाणीटंचाई जाणवते. ही समस्या लक्षात घेऊन मुंबई येथील ‘जलवर्धिनी’ ही संस्था रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवत आहेत. या संस्थेने गुहागर तालुक्यात फेरोसिमेंटच्या 17 टाक्यांची यशस्वी बांधणी केली आहे. सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागात अशा आणखी टाक्या बांधण्याचे काम सुरु आहे. जलदिनाच्या निमित्ताने पिंपर येथील किरण बावधनकर यांच्या शेतावर या टाकीचे बांधकाम सुरु झाले आहे. कोकणासाठी या टाक्या वरदान ठरणार आहेत. टाक्यांची पाहाणी गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी नुकतीच केली. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने या टाक्या बांधल्या जात आहेत.पावसाळ्यात या टाक्या पाण्याने भरणार असून उन्हाळ्याच्या दिवसात बागायती आणि शेतीसाठी हे पाणी वापरता येऊ शकते. 

त्यामुळे उन्हाळी शेतीसाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे. कोकणातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पावसाचे पाणी साठवणूक करणे काळाची गरज आहे. त्यामुळे ‘जलवर्धिनी’ संस्थेचा हा उपक्रम गुहागर तालुक्यात लोकप्रिय होत आहे.  तालुक्यातील आठ गावांत 17 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यातून अडीच लाख लिटर पाणी साठविण्यात येणार आहे. या पाण्यातून उन्हाळ्यात फळझाड लागवड करण्यासाठी पाण्याची व्यवस्था होणार आहे. यातून आंबा, काजू, केळीआदी लागवड करणे शक्य होणार आहे. 

 Tags : Guhagar,  Rain Water Harvesting, Use, kokan news