Sun, Jan 19, 2020 21:19होमपेज › Konkan › ‘डोकलाम वादा’मुळे चिनी वस्तूंवर अघोषित बंदी!

‘डोकलाम वादा’मुळे चिनी वस्तूंवर अघोषित बंदी!

Published On: Sep 13 2018 1:45AM | Last Updated: Sep 12 2018 9:36PMसावंतवाडी : नागेश पाटील 

गेली काही वर्षे गणेशोत्सव, दिवाळी या महत्वाच्या उत्सवांबरोबरच चिनी इलेक्ट्रॉनिक्स  व शोभेच्या वस्तूंनी बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता. मात्र, गती वर्षी भारत आणि चीन यांच्यात उद्भवलेला ‘डोकलाम’ वाद , चायना मालाचा निकृष्ट दर्जा व त्याचे आरोग्य, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम यामुळे बहुतांश ग्राहकांना चिनी मालावर अघोषित बष्हिकार टाकला आहे. परिणामी  या गणेशोत्सवात चायनामेड वस्तूंच्या विक्रीत कमालीची घट आली आहे. अर्थात या बदल्यात  ‘मेड इन इंडिया’ वस्तुंना ग्राहकांची पसंती असल्याचे विक्रेते सांगतात.

विविध प्रकारची खेळणी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, सजावटीचे साहित्य, खाद्य पदार्थ  किंबहुना जगात बनणार्‍या सर्वच वस्तू बनविण्यात चीन आघाडीवर आहे.आपल्या प्रचंड लोकसंख्येचा वापर करुन चीनने स्वतःला जागतिक करखानाच बनवला आहे. अत्यंत आकर्षक डिझाईन, रंग, वजनाला हलके व तुलनेने किंमत अत्यंत कमी, यामुळे जगभरातील ग्राहक चिनी मालाचा ग्राहक बनला आहे. मात्र, दुसरीकडे चीनी माल म्हणजे ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’, थोडक्यात ‘चिनी बनावटीचा’ हा शब्द दर्जाहीन उत्पादनासाठी समानार्थी शब्द बनला आहे. तरीही भारतातील सर्वसामान्य ग्राहक चीनी मालाचा खरेदीदार होता. मात्र डोकलाम वादा नंतर भारतीयांच्या मनात चीन बद्दल नकारात्मक व संतापाची भावना निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून  आज भारतीय ग्राहक चीनी वस्तू खरेदी करण्याचे कटाक्षाने टाळत आहे.

दुसरीकडे चिनी वस्तूंच्या उत्पादनात वापरण्यात येणारे घटक हे अत्यंत विषारी, आरोग्यास व पर्यावरणास हानी पोहोचविणारे असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याचाही परिणाम चीनी उत्पादनांच्या विक्रीवर झाला आहे.  गणेशोत्सव म्हटलं की विद्युत दिव्यांच्या आकर्षक माळा, मखर, कृत्रिम पुष्प सजावट आलीच.  दरवर्षी या  साहित्यात चीनी वस्तूंची चलती असत. मात्र, या वर्षी भारतीय उत्पादनाना अधिक मागणी असल्याचे दिसून येते.   यंदा बाजारात लेझर मशीन, रोप लाईट, जेली माळ, ड्रॉप लाईट, फोकस लाईट, डमरू माळ अशा विविध प्रकारचे उत्पादने बाजारपेठेत आलेली आहेत. भारतीय उत्पादने ही चायनीज मालापेक्षा काहीसी महाग असली तरी दर्जेदार आहेत.   यातूनच पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया’ धोरणाला चालना मिळाली आहे.