Tue, Jul 16, 2019 12:15होमपेज › Konkan › समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू

समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:31PMदापोली : वार्ताहर

तालुक्यातील हर्णै बंदरापासून चार किलोमीटर असलेल्या सालदुरे समुद्रकिनारी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये अशोक नारायण पुजारी (वय 38, रा. सोलापूर) आणि राजेश सीताराम वंगारी (35, रा. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. हे तिघे दापोलीत फिरण्यासाठी आले होते.

सालदुरे समुद्रकिनारी दापोलीमध्ये पर्यटनासाठी आलेले तिघे फिरण्यासाठी गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास यातील अशोक पुजारी व राजेश वंगारी हे समुद्रामध्ये पोहायला गेले होते. त्यांचा मित्र कृष्णा हा किनार्‍यावरच थांबला होता. काही वेळ आपले दोन मित्र पाण्यात पोहत होते. मात्र, याच दरम्यान ते बुडताना मित्राने पाहिले आणि आरडाओरड केली. याच दरम्यान किनार्‍यावरील काहींनी बुडणर्‍या या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या नंतर तत्काळ दोघांनाही पाण्याबाहेर काढून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी या दोघांनाही मृत घोषित केले. याबाबत मित्र कृष्णा याने दापोली पोलिस ठाण्यात खबर दिली. घटनेची माहिती मिळताच हर्णै पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.