Sat, Jul 20, 2019 02:58होमपेज › Konkan › बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींना पळविले

बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींना पळविले

Published On: Jan 18 2018 11:28PM | Last Updated: Jan 18 2018 11:28PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील हातखंबा येथील माहेर बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्‍याची घटना समोर आली आहे. याबाबत बालगृहाचे अधीक्षक सुनील कुलदीप कांबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दर्शना पांचाळ (वय 17, रा. कणकवली) आणि सुप्रिया वाघमारे (रा. दापोली) अशी पळवून नेलेल्‍या मुलींची नावे आहेत. 

गुरूवारी सायंकाळी 4.30 वाजता या दोन अल्पवयीन तरूणी बालगृहात दिसून आल्या नाहीत. त्यांचा शोध घेण्यात आला तरीही त्या मिळून न आल्याने अखेर अधीक्षकांनी ग्रामीण पोलिसांकडे तरूणींना पळवून नेल्याची तक्रार केली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक मढवी अधिक तपास करीत आहेत.