Tue, Jul 16, 2019 13:45होमपेज › Konkan › खेडसाठी नगरोत्थानमधून दोन कोटी

खेडसाठी नगरोत्थानमधून दोन कोटी

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 11:53PM खेड : प्रतिनिधी

नगर परिषदेमार्फत शहरात विकासकामे वेगाने सुरू असून पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नगरोत्थान अंतर्गत गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. दि. 15 रोजी शहरात विकासकामे करण्यासाठी 19 कामे पालकमंत्री वायकर यांच्याकडे सुचवण्यात आली होती. त्या कामांसाठी नुकतीच पालकमंत्री यांनी मंजुरी दिली आहे. सन 2017-18 च्या नगरोत्थान निधीतून 2 कोटी 49 लाख 15 हजार 662 रूपये निधीच्या कामे आता होणार आहे, अशी माहिती न. प. तील शिवसेनेचे गटनेते बाळा खेडेकर यांनी पत्रकारांना दिली आहे.

पालिकेतील शिवसेनेचे गटनेते बाळा खेडेकर म्हणाले, ना. वायकर यांना सन2017-18मध्ये नगरोत्थान अंतर्गत विविध 19 विकासकामांसाठी निधी मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार खेड नगर परिषदेच्या प्रबोधनकार ठाकरे उद्यान सुशोभिकरणासाठी 60 लाख, शिवसमर्थनगर येथील अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरणासाठी 13 लाख 93 हजार, डाकबंगला येथे महाडिक व मन्सूर मुकादम यांच्या घरापासून ते उमर शेख यांच्या घरापर्यंत गटार बांधण्यासाठी 5 लाख 77 हजार, शिवतररोड येथे देसाई यांच्या घरापासून शिरगावकर यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधण्यासाठी 8 लाख 34 हजार, डाकबंगला येथे इमेज गार्डन अपार्टमेंटपासून नाडकर व्हिलापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी 13 लाख 39 हजार, कुवारसाई येथे गटाराच्या नूतनीकरणासाठी 7 लाख 3 हजार, क्षेत्रपालनगर येथील बंदिस्त गटार बांधण्यासाठी 9 लाख 95 हजार, चिपळूणनाका ते बंदरनाका पर्यंत रस्त्याच्या बाजूला गटाराच्या बांधकामासाठी 16 लाख 8 हजार, एकवीरानगर येथे आरसीसी गटार बांधण्यासाठी 8 लाख 4 हजार, बाजारपेठ वालकी गल्ली रस्ता नूतनीकरणासाठी 14 लाख 52 हजार, जाधववाडी येथे रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 5 लाख 15 हजार, महात्मा फुलेनगर सुरेश चव्हाण यांच्या घरासमोर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 5 वाख 57 हजार, बाजारपेठ येथे तोडकरी यांच्या घरापासून ते दिप्ती स्टोअर्सपर्यंत आरसीसी गटार बांधण्यासाठी 15 लाख 43 हजार, समर्थनगर येथील पर्‍याला नवीन गटार जोडण्यासाठी 5 लाख 82 हजार, श्री लक्ष्मी नारायण मंदिरापासून शाम जोशी यांच्या घरापर्यंत गटार बांधण्यासाठी 6 लाख 33 हजार, चिपळूणनाका येथे आरसीसी गॅलरी बांधण्यासाठी 18 लाख 49 हजार, संत रोहिदासनगरपर्यंत गटार बांधण्यासाठी 8 लाख 34 हजार, नगरपालिका बालवाडीपासून ते हुसैनी चाळीपर्यंत भुयारी गटार बांधण्यासाठी 17 लाख व केजीएन पार्ककडे जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी 9 लाख 80 हजार रूपयांच्या कामांना मान्यता देवून निधी वर्ग करावा, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केल्या आहेत. 

Tag : Development Project, Khed, Crores, Khed City, Kokan, Kokan Development