Mon, May 20, 2019 22:16होमपेज › Konkan › ट्रक- मोटारसायकल धडकेत तळवणेतील तरुण ठार

ट्रक- मोटारसायकल धडकेत तळवणेतील तरुण ठार

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:11PMमळेवाड : वार्ताहर

तळवणे येथे आयशर ट्रकची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सिद्देश ऊर्फ गोट्या लवू कांबळी(25) हा जागीच ठार झाला.  शुक्रवारी सायंकाळी 6 वा. हा अपघात झाला. ट्रक तळवणे ते कोंडुरा अशी चिरे वाहतूक करत होता.  गोट्या हा गोवा येथील खासगी कंपनीत कामाल होता. शुक्रवारी सायंकाळी तो कामावरून घरी परत असताना हा अपघातात झाला.  अपघातात त्याच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

नेहमी हेल्मेटचा वापर करणार्‍या गोट्याने नेमके आज हेल्मेट वापरले नव्हते. अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तळवणे - आरोंदा मार्गावर रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली.  घटनास्थळी आरोदा दूरक्षेत्रचे भिसे यांनी जाऊन पंचनामा केला. गोट्या हा गोवा येथील खासगी कंपनीत कामाला होता. तसेच तो उत्कृष्ट दशावतारी कलाकार व उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. 

Tags : kokkan news, Truck-motorcycle accident, Young killed, Talavane,