होमपेज › Konkan › ट्रक, डंपर चोरीप्रकरणी तिघे ताब्यात

ट्रक, डंपर चोरीप्रकरणी तिघे ताब्यात

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 11:13PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

डंपर, ट्रक चोरीप्रकरणी सांगली पोलिसांनी कोल्हापुरातील एका सराईतासह तिघांना बुधवारी ताब्यात घेतले आहे. चोरलेली काही वाहने लक्ष्मीपुरी येथील कोंडाओळजवळील गाडीअड्ड्यांवर दडवून ठेवल्याचा पोलिसांचा संशय आहे. संशयास्पद वाहनांच्या शोधासाठी सांगली पोलिसांनी दिवसभर ठाण मांडले होते.

पश्‍चिम महाराष्ट्रातून अवजड वाहने विशेष करून डंपर, टॅकर व ट्रक चोरणार्‍या सराईत टोळीचा सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला छडा लागला आहे. पथकाने सांगली व कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत वाहनांच्या चोरीचे आणखी काही गुन्हे निष्पन्‍न झाल्याचे समजते.

चोरलेल्या काही वाहनांची कोल्हापुरात विक्री केल्याचे, तर काही वाहने गाडीअड्ड्यावर दडवून ठेवण्यात आल्याची पथकाला माहिती मिळाली आहे. सांगली पोलिसांचे पथक सकाळी येथे दाखल झाले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांसह पोलिस नियंत्रण कक्षांशी संपर्क साधून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. गुरुवार (दि.21) सकाळपासून संशयास्पद वाहनांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे,  असे पोलिस निरीक्षक राजन पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सायंकाळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याशी संपर्क साधून चोरीप्रकरणी सराईत टोळीच्या कारनाम्यांची माहिती दिली.