Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Konkan › वागदेत गडनदीपात्रात ट्रक कोसळला

वागदेत गडनदीपात्रात ट्रक कोसळला

Published On: May 18 2018 11:16PM | Last Updated: May 18 2018 10:37PM कणकवली : प्रतिनिधी

आशिये येथील सदानंद बाणे यांच्या मालकीचा ट्रक शुक्रवारी पहाटे कणकवलीतून असरोंडी येथे चिरे भरण्यासाठी जात असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून महामार्गावर वागदे ग्रा. पं. नजीक उजव्या बाजूला एका पोलावर आदळणार होता. पोलची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट घळणातून घसरून गडनदीपात्रात कोसळला. सुदैवाने हमाल आणि चालकाने बाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली.  ही घटना शुक्रवारी पहाटे 4 वा. च्या सुमारास घडली. असरोंडी येथे नेहमीप्रमाणे चिरे भरण्यासाठी पहाटे निघाला होता.

या ट्रकमध्ये चालक आणि दोन हमाल होते. ट्रक चालकाला अचानक डुलकी आल्याने त्याचा ताबा सुटला असावा आणि ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला जावून तो घळणातून गडनदी पात्रात कोसळला असे स्थानिकांनी सांगितले. सुदैवानेच ट्रकचालक व हमालांनी उड्या मारल्याने जिवीतहानी टळली व किरकोळ दुखापतीवर निभावले. या अपघाताची नोंद पोलिस स्थानकात नव्हती. सकाळी माजी उपसभापती महेश गुरव व स्थानिकांनी भेट देवून ट्रकच्या नुकसानीची पाहणी केली.