Tue, Jan 22, 2019 22:53होमपेज › Konkan › वृक्ष लागवड अभियान जिओ टॅगिंगद्वारे ऑनलाईन

वृक्ष लागवड अभियान जिओ टॅगिंगद्वारे ऑनलाईन

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 9:31PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शतकोटी वृक्ष लागवड अभियानात  यावर्षी कोकणासाठी 1 कोटी 33 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.  त्यापैकी जुलै महिन्यात सुरू होणार्‍या वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यासाठी  सुमारे 35 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात  आले आहे. यासाठी  एक लाख हरित सैनिकांची फौज तयार करण्यात येणार आहे. या लागवडीचे जिओ टॅगिंंगद्वारे ऑनलाईन अपडेट घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली. 

जागतिक तापमान वाढीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात शतकोटी वृक्ष लागवड अभियानात यावर्षी 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. अलीकडेच यासंदर्भात कोकण आयुक्‍तांनी बैठक घेऊन कोकणातील प्रशासनांना अभियानाचे उद्दिष्ट आणि कृती आराखडा ठेवण्यात आला होता.  यानुसार जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदशर्र्नाखाली वृक्ष लागवड अभियनाचे  बुधवारी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोकणासाठी 1 कोटी 33 लाखांची वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी 35 लाख झाडे या अभियानात लावण्यात येणार आहेत. यासाठी नियोजनानुसार 30 एप्रिलपर्यंत वृक्ष लागवडीचे क्षेत्र निश्‍चित करण्यात येणार आहे. या अभियानात शासकीय कार्यालये,  शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी,  ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, क्रीडा मंडळे, ग्रामपंचायती आदींसह खासगी कंपन्या व्यवस्थापनांचा सहभाग घेण्यात येणार आहे. 

Tags : Konkan, Tree, plantation, campaign, online, live, tagging