Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Konkan › ‘हापूस’ला तारण्यासाठी व्यापार परिषद, महोत्सव

‘हापूस’ला तारण्यासाठी व्यापार परिषद, महोत्सव

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 10:56PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

कोकणची सुमारे 1 हजार कोटींची अर्थव्यवस्था असलेल्या हापूस आंब्याचे उत्पादन यंदा दरवर्षीच्या तुलनेत 25 टक्केच आले आहे. कमी आंबा व उशिराने उत्पादन, यामुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यावर उपाय म्हणून ग्लोबल कोकणच्या वतीने दि. 1 ते 7 मे रोजी नेहरू विज्ञान केंद्र, ई मोजेस रोड, वरळी येथे शेतकरी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याशिवाय 2 मे रोजी बागायतदार-निर्यातदार व्यापार परिषदही आयोजित केली आहे.

खते, फवारण्या, मजुरी, लाकडी पेट्या खर्च दरवर्षी एवढाच. मात्र, उत्पन्‍न 25 टक्के. यामुळे कोकणातील आंबा बागायतदार अत्यंत अडचणीत आहेत. स्वाभिमानी कोकणी शेतकरी कितीही अडचणीत असला, तरी शासनाकडे मदतीची याचना करीत नाही. परंतु, यावेळी शासनाने मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. मुळात उत्पन्‍न कमी असल्यामुळे आता 15 मेपर्यंत कोकणात फारसा आंबा कुठेच उपलब्ध नाही. यामुळे फार कमी प्रमाणात हापूस आंबा कोकणातून मुंबईत जात आहे. कोकणातील हापूस आंब्याची बाजारपेठ मुंबईतील दलालांवर अवलंबून आहे. हापूस आंबा सर्वप्रथम वाशी मार्केटला येतो.