Mon, Jun 24, 2019 21:38होमपेज › Konkan › किनारी पर्यटनासाठी ‘टूरिस्ट कोस्टल सेफ्टी’ कार्यक्रम

किनारी पर्यटनासाठी ‘टूरिस्ट कोस्टल सेफ्टी’ कार्यक्रम

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:34PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

जिल्ह्यातील किनारी पर्यटनाला   प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेल्या सागरी किनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ‘टूरिस्ट कोस्टल सेफ्टी प्रोग्राम’ (टीसीएसपी) राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली. या उपक्रमाची रायगड जिल्ह्यात अंमलबजावणी केल्यानंतर तो रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाद्वारे  जिल्ह्यात किनारी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी पोहण्यासाठी सुरक्षित क्षेत्र, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक, सुरक्षा यंत्रणेसाठी स्वतंत्र कोस्टल टूरिस्ट पोलिस (सीटीपी) आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, मालगुंड, दापोली, गुहागर आदी सागरी किनार्‍यांना देशी-परदेशी पर्यटकांचा प्रतिसाद मिळतो. गणपतीपुळे या सर्वात गजबजलेल्या ठिकाणी नेहमीच  पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांत या ठिकाणी 

समुद्रस्नानासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे तर विविध उपाययोजना  करुनही अनेक पर्यटकांचा येथील जीवरक्षकांनी जीवही वाचविला आहे. पर्यटकांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे किनारे धोेकादायक  झाले आहे. याचा परिणाम येथील पर्यटनावर होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सागरी सुरक्षा कायक्रम राबविला आहे.  यामध्ये पर्यटकांसाठी सुरक्षित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी लाल आणि पिवळ्या झेंड्याद्वारे या क्षेत्राची निर्देश देण्यात येणार आहे. या क्षेत्रामध्ये पर्यटकांसाठी सागरी स्नासाठी सुरक्षित झोन तयार करण्यात येणार आहेत. त्याचे निर्देश हिरव्या झेंड्याद्वारे दर्शविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित स्विमरद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे बीचवर दक्षता बाळगण्यात येणार आहे.