होमपेज › Konkan › आजची रात्र वर्षातील सर्वात मोठी!

आजची रात्र वर्षातील सर्वात मोठी!

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:32PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

वर्षातील सर्वात मोठी रात्र दि. 22 डिसेंबरला असते, तर दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. या दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. शुक्रवारच्या रात्रीचे हे औचित्य साधून गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. 

दि. 22 डिसेंबर रोजी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सूर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. खगोलीय घटनेप्रमाणे 21 जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलण्यास सुरुवात करते. या दिवसापासून सूर्याचे दक्षिणायन होण्याला सुरुवात होते. हा क्रम 21 डिसेंबरपर्यंत चालतो.

त्यामुळे 22 डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून, त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती 21 जूनपर्यंत चालत असते. हिंदू संस्कृतीमध्ये या शुक्रवारच्या दिवसाचे फार महत्त्व आहे. शुक्रवारपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे. पौराणिक कथेनुसार आजच्या दिवशी महाभारतातील भीष्मपितामह यांनी आपला शरपंजर देह सोडला.