Thu, Jul 18, 2019 02:18होमपेज › Konkan › रत्नागिरीत उद्या राऊंड टेबल कॉन्फरन्स

रत्नागिरीत उद्या राऊंड टेबल कॉन्फरन्स

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणच्या गतिमान विकासासाठी कृषी, पर्यटन, मत्स्य व वाहतूक क्षेत्रातील विविध प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकारी व प्रतिनिधींची 1 एप्रिल रोजी रत्नागिरी येथे राऊंड टेबल कॉन्फरन्सहोणार आहे.

या बैठकीला एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केंद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाईस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी आदी उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

कोकणातील तरुण हा नोकरीनिमित्त शहरामध्ये जाणार नाही. त्याला कोकणातच रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनांचे निर्णयक्षम उच्च अधिकारी नियोजनबद्ध आराखडा निर्माण करून रोजगाराचे नियोजन करण्याच्या द‍ृष्टीने या बैठकीत विशेष भर दिला जाणार आहे. यामध्ये कोकणात कोणत्या प्रकारचे उपक्रम निर्माण करता येतील, याबाबतही या राऊंड टेबल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत कृषी, मत्स्य, पर्यटन आदी क्षेत्रांत उद्योग उभारणीस आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा व भांडवल आवश्यक आहे. याबाबतही सकारात्मक चर्चा या कॉन्फरन्समध्ये होणार आहे. सुरेश प्रभू यांनी हवाई परिवहन मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच रत्नागिरीमध्ये येत असल्याने रत्नागिरी येथून हवाई वाहतुकीचे स्वप्न लवकरच साकारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे

Tags : Konkan, Konkan News, Tomorrow, Round Table Conference,  Ratnagiri


  •