Wed, Apr 24, 2019 08:28होमपेज › Konkan › नारायण राणे व ना.दीपक केसरकर एकाच व्यासपीठावर  

सिंधु पशू-पक्षी मेळाव्याचे आज उद्घाटन

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 10:34PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

सिंधु कृषी औद्योगिक  पशु-पक्षी  मत्स्य व्यवसाय प्रदर्शन व पर्यटन मेळाव्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री नारायण राणे व पालकमंत्री दीपक केसरकर हे दोन राजकीय शत्रु शनिवारी  कुडाळ येथील एकाच व्यासपीठावर येणार आहेत. गेले काही महिने या दोन्ही दिग्गज  नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी सोडली नाही. परिणामी  आता कृषी मेळाव्याच्या निमित्ताने ते काय बोलतात याकडे जिल्हावसीयांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सिंधुदुर्ग जि. प. कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती राहणार आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून खा. विनायक राऊत, आ. अनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे, आ. बाळाराम पाटील, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस. पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, शारदा कांबळी, सायली सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, नगराध्यक्ष विनायक राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व पं. स. चे  सभापती, जि.प. सदस्य यांनी या मेळाव्याला  उपस्थित राहावे असे आवाहन जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले आहे.