होमपेज › Konkan › ‘कोरे’ मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या

‘कोरे’ मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 10:47PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामासाठी आणखी तीन विशेष गाड्या सोमवारी जाहीर करण्यात आल्या. ‘सीएसएमटी’ - करमाळी, तसेच पनवेल - करमाळी मार्गावर या गाड्या दि. 2 मेपासून धावू लागल्या आहेत. यामुळे  ऐन गर्दीच्या कोकणात येणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामासाठी या आधी अनेक विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश गाड्या सुरुही झाल्या आहेत. सोमवारी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तीन विशेष गाड्यांमध्ये ‘सीएसएमटी’ - करमाळी ही गाडी  (01127/28)  ही गाडी मुंबईतील ‘सीएसएमटी’हून रात्री 12.20 वा. सुटून दुसर्‍या दिवशी ती  गोव्यात करमाळी स्थानकावर सकाळी 11.30 वा. पोहचेल. ही गाडी दि. 4 मे रोजी करमाळीहून  मुंबईतील ‘सीएसएमटी’साठी सकाळी 10.20 वा. निघेल आणि त्याच दिवशी रात्री 11.15 वा. ती मुंबईला पोहचेल.  ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ तसेच थिवी स्थानकांवर थांबणार आहे.

दुसरी विशेष गाडी (01129/30) ही  बुधवारी रात्री 11.40 वा. पनवेलहून करमाळीसाठी सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता ती करमाळीला पोहचणार आहे. ही गाडी त्याच दिवशी करमाळीहून पनवेल दु. 2 वाजता सुटून रात्री 10.40 वाजता ती पनवेलला पोहचेल. तिसरी विशेष गाडी (01131/32) दि. 3 मे रोजी ही पनवेल - करमाळी - पनवेल अशी धावणार आहे. या दोन्ही गाड्यांना रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली कुडाळ तसेच थिवी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

Tags : Konkan, Three, special, trains, Kore, route