Fri, Feb 22, 2019 11:42होमपेज › Konkan › तीन लाखांची गोवा बनावटीची दारू जप्‍त

तीन लाखांची गोवा बनावटीची दारू जप्‍त

Published On: Feb 01 2018 11:22PM | Last Updated: Feb 01 2018 10:11PMसावर्डे : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे वहाळफाटा नजीक दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता  स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गोवा मुंबईच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप (एमएच-07- पी- 3037)  गाडीमधील गोवा बनावटीची तीन लाख पाच हजार रुपये किमतीची दारु व बोलेरो गाडी असा एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. चालक परशुराम महेश कुडाळकर (रा. झाराप-कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारु वाहतूक करीत असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला लागली. यानंतर सावर्डे पोलिस ठाणे व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाडीचा पाठलाग करून दुपारी साडेबारा वाजता सावर्डे वहाळफाटा नजीक गाडीची तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीत गोवा बनावटीची दारू आढळून आली. यामध्ये 80 हजार गोल्डन व्हिस्की; 86 हजार ब्लॅक ट्रिपल रम;32 हजार हायवर्ड;15 हजार टँगो व्हिस्की;42 हजार एस व्हिस्की अशी तीन लाख पाच हजार किमतीची दारू पथकाने जप्‍त करण्यात आली आहे.

या पथकात निरीक्षक रविराज फडणीस, आर. बी. बागुल, यू. डी. वाजे, व्ही. जी. मोरे, आर. डी. कांबळे व सावर्डे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास  गजानन रामागडे करीत आहेत.