Sun, Feb 17, 2019 05:01होमपेज › Konkan › येलूर येथे वीज धक्क्याने तिघांचा मृत्यू

येलूर येथे वीज धक्क्याने तिघांचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इटकरे/कुरळप : वार्ताहर

शेतात तुटून पडलेल्या विद्युत वाहिन्यांचा धक्‍का बसून वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये माय-लेकरासह मजुराचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने  दोघांचा प्राण वाचला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. प्रभाकर लक्ष्मण महाडिक (वय 35), छाया लक्ष्मण महाडिक (55, दोघे रा. येलूर), प्रकाश भीमाण्णा मगदूम (51, रा. मेंडीगिरी, ता. जत) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रकाश महाडिक व रत्नमाला महाडिक अशी या घटनेतून बचावलेल्यांची नावे आहेत.

येलूरचे माजी सरपंच जे. टी. महाडिक यांच्याकडे काम करणारा मजूर प्रकाश मगदूम हा शनिवारी पहाटे शेतात पाणी पाजण्यास गेला होता. उसाच्या शेतात विजेच्या तुटून पडलेल्या तारेचा स्पर्श होताच विजेच्या धक्क्याने मगदूम याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळाने प्रभाकर महाडिक व  त्यांची आई छाया महाडिक हे दोघे पाणी पाजण्यासाठी शेतात निघाले होते. त्यांचाही याच विद्युत तारेचा धक्‍का बसून जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, प्रकाश मगदूम हा शेतातून परत का आला नाही म्हणून जे. टी. महाडिक यांच्या स्नुषा रत्नमाला महाडिक पहाटे सहाच्या सुमारास त्याला फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, फोन उचलत नसल्याने त्या शेताच्या दिशेने त्याला शोधण्यासाठी गेल्या. त्यावेळी मगदूमच्या फोनवर रिंग वाजत होती. तेथून निघालेल्या प्रकाश महाडिक यांना मोबाईलची रिंग ऐकू आली. त्या आवाजाच्या दिशेने ते गेले असता त्या तिघांचा मृतदेह त्यांना आढळून आला.

Tags : Konkan, Konkan News, Three deaths, Yelur, electricity, shock


  •