Sun, May 31, 2020 18:30होमपेज › Konkan › कुडाळात २ ग्रा.पं.वर सेना, १ ग्रा.पं.वर स्वाभिमानची सत्ता

कुडाळात २ ग्रा.पं.वर सेना, १ ग्रा.पं.वर स्वाभिमानची सत्ता

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:35PM

बुकमार्क करा
कुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पैकी वालावल (अणाव) व हुमरमळा-वालावल ग्रामपंचायतमध्ये  शिवसेना पुरस्कृत  गावविकास पॅनेलने  तर वालावल ग्रा.पं.मध्ये  स्वाभिमान पुरस्कृत गावविकास पॅनेलने बाजी मारली. विजयानंतर  कुडाळ तहसील आवारात विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्‍लोष   केला.

हुमरमळा सरपंचपदी  शिवसेनेच्या अर्चना बंगे तर सदस्यपदी  चंद्रकांत  माडये, रमा आत्माराम गाळवणकर, गिरीजा गुंजकर, शिल्पा मयेकर, सोनाली मांजरेकर व स्नेहदीप सामंत याची बिनविरोध निवड झाली होती. केवळ प्रभाग दोनमध्ये  अमृत  देसाई (124) व प्रवीण मार्गी (76) यांच्यात  लढत झाली. या लढतीत  अमृत देसाई विजयी झाले. विशेष म्हणजे माजी पं.स.सदस्य अतुल बंगे यांनी आपले याठिकाणी  निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले.

वालावल ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी स्वाभिमान  पुरस्कृत  गाव पॅनलचे नीलेश साळस्कर (631) विजयी झाले. याठिकाणी संदेश मठकर (242), लक्ष्मण पेडणेकर (279), दर्शना बंगे (240), दीपिका वालावलकर (262), कल्पना चौधरी (303), राजेश प्रभू (311), गणेश चव्हाण (184), भाग्यश्री आंबेरकर (196), मानसी चव्हाण (201) विजयी झाले. याठिकाणी  शिवसेनेला खातेही खोलता आले  नाही. जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सरपंच नीलेश साळसकर यांच्यासह राजा प्रभू व सर्व विजयी सदस्यांचे स्वागत केले.

हुमरमळा-अणाव सरपंचपदी जान्हवी  पालव (374) या विजयी झाल्या. त्यांनी समीधा पालव (332) यांचा पराभव केला. याठिकाणी समीर दिनकर पालव (134), दीक्षिता दीपक सावंत (145), भारती भास्कर राणे (174) विजयी झाले.  एकनाथ तुकाराम गोसावी व मिताली वसंत कोचरेकर बिनविरोध निवडून आले होते.निकालानंतर जि.प. सदस्य अमरसेन सावंत, संजय पडते, पं.स.सदस्य जयभारत पालव आदी पदाधिकार्‍यांनी  जल्‍लोषी स्वागत केले.