Sun, Jul 21, 2019 05:39होमपेज › Konkan › रेल्वेत खाणार त्याला ‘पोओएस’ बिल देणार!

रेल्वेत खाणार त्याला ‘पोओएस’ बिल देणार!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


रेल्वे प्रवास करताना गाडीत व्हेंडर्स तथा विक्रेत्यांकडून खाद्य पदार्थांसाठी वाजवी किमतीपेक्षा अधिक पैसे वसूल केल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्याने रेल्वे आता आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. रेल्वे गाडीत खाद्यपदार्थांच्या दर आकारणीत व्हेंडर्सकडून होणार्‍या मनमानीला चाप बसावा, यासाठी आता पीओएस (पॉईंट ऑफ सेल) या हॅन्डहेल्ड मशिनचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये खानपान सेवा पुरवणार्‍या ‘आयआरसीटी’ने निर्धारित केलेल्या दरानुसार प्रवाशांकडून बिल घेतले जाणार आहे. यासाठी गाडीत खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या अधिकृत व्हेंडर्सना पेट्रोल पंपावर अगर अलीकडेे  कॅशलेस प्रणालीत दुकानांमध्ये  वापरलेल्या जाते, त्याप्रमाणे ‘पीओएस’ उपकरणे पुरवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विक्रेते निर्धारित दरापेक्षा  अधिक पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पण, आता याला चाप बसणार आहे. कारण ‘पीओएस’ मशिनमुळे  पदार्थनिहाय त्यांचे निर्धारित बिलच विक्रेते घेऊ शकरणार आहेत. उदा. ट्रेनमध्ये चहा /कॉफी 7 रुपये असेल किंवा पाण्याची बाटली 15 रुपये, नाश्त्याचा दर 30 रुपये असेल तर त्यापेक्षा एकही रुपया व्हेंडर्सला प्रवाशाकडून जादा घेता येणार नाही. प्रवाशांनी व्हेंडर्सकडून खाद्य पदार्थांचे ‘पीओएस’ यंत्रांमार्फत दिले जाणारे बिल  मागून घ्यावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

याचबरोबर रेल्वे गाड्यांमध्ये खानपान सेवा योग्य प्रकारे पुरवली जाते की नाही, हे तपासण्यासाठी  स्वतंत्र गाडीत एका ऑनबोर्ड अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार गाडीत ‘पीओएस’ मशिनद्वारे खाद्य पदार्थांचे बिल देण्याची सुविधा टप्प्याटप्प्याने सुरु केली जात आहे. सध्या वेगवेगळ्या मार्गांवरील 22  गाड्यांमध्ये ही सुविधा पुरवण्यात येईल.  त्यापाठोपाठ इतरही गाड्यांमध्ये व्हेंडर्सकडे तुम्हाला अशी ‘पीओएस’ मशिन्स पहायला मिळतील. सध्या एका गाडीसाठी दोन याप्रमाणे पीओएस यंत्रे पुरवली जाणार आहेत.  तेव्हा तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल आणि खाद्य पदार्थांसाठी वाजवी दरापेक्षा अधिक पैसे तुमच्याकडून घेतले जात असतील तर रेल्वेच्या या नव्या सुविधेबाबत तुम्ही अपडेटेड असायलाच हवे.

Tags : Konkan Konkan News, eat, railway, POS system, bill, Indian Railway  


  •