Thu, Jun 27, 2019 00:09होमपेज › Konkan › ‘थर्टी फर्स्ट’वर प्रशासनाचा वॉच!

‘थर्टी फर्स्ट’वर प्रशासनाचा वॉच!

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:20PM

बुकमार्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी

‘थर्टी फर्स्ट’च्या आणि नववर्षानिमित्त होणार्‍या जल्लोषी पार्ट्यांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असून यासाठी  पोलिसांच्या सहकार्याने ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. 
थर्टी फर्स्ट’चा जल्लोष आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पहाटेपर्यंत दुकाने, मॉल हॉटेल्स तसेच बार सुरू राहणार असून या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी  शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

‘थर्टी फर्स्ट’  आणि नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांदरम्यान कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी शनिवारी जिल्हा प्रशासनाने  विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीतीत बैठक घेतली. यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महावितरणचे मुख्य अभियंता, प्रदूषण नियंत्रण विभागीय अधिकार्‍यांसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील सागरी किनार्‍यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जल्‍लोषादरम्यान लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन शहरातील तसेच ग्रामीण भागातील किनारी गावांमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. यासाठी किनारी गावांत ग्रामपंचायतींची सुरक्षा समिती नेमण्यात आली आहे. तसेच किनार्‍यांवर विजेची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने ‘महावितरण’ला दिल्या आहेत.