Thu, Dec 12, 2019 09:34होमपेज › Konkan › गांजाप्रकरणी तरुणास अटक

गांजाप्रकरणी तरुणास अटक

Published On: Oct 15 2018 1:25AM | Last Updated: Oct 15 2018 1:25AMरत्नागिरी : प्रतिनिधी

रेल्वेस्टेशन फाट्याजवळ शनिवारी रात्री दोन किलो गांज्यासह तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. शिवलिंगप्पा पुजारी (रा. साळवीस्टॉप) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात गांजा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांनी रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर आपल्या पथकासह नाकाबंदी केली होती. रात्री 9 वा. शिवलिंगप्पा पुजारी दुचाकीवरून भरधाव वेगाने रत्नागिरीत येत होता.  त्याच्या दुचाकीच्या डिकीत सुमारे 2 किलो गांजा आढळला. दुचाकी, गांजा जप्त करून पुजारीवर गुन्हा दाखल केला आहे.