Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Konkan › मासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला

मासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:53PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

खेर्डी स्मशानभूमीजवळ वाशिष्ठी नदीत तरुणाचा मृतदेह आढळला. प्रसाद रेळेकर (वय 21, तीनवड पिंपळी, कडववाडी) असे या तरुणाचे नाव आहे. तो मासे पकडण्यासाठी गेला असताना नदीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत खेर्डी येथील नसरुद्दीन हमीद शेख यांनी पोलिसांत माहिती दिली. सकाळच्या वेळी त्यांना खेर्डी नदीत मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती देताच मृतदेहाची ओळख पटली. प्रसाद हा गेले दोन दिवस बेपत्ता होता. कोयनेचे अवजल मोठ्या प्रमाणात आल्याने तो नदीतून वाहून गेला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शेळके करीत आहेत.