Sat, Dec 14, 2019 02:17होमपेज › Konkan › सती येथे चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

सती येथे चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

Published On: Jul 18 2019 1:56AM | Last Updated: Jul 18 2019 12:14AM
चिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळूण-कराड मार्गावरील सती येथील तीन दुकाने अज्ञातांनी फोडून 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

याबाबत मिनानाथ धोंडिराम संधे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना दि. 16 रोजी रात्री 9.30 वाजल्यानंतर घडली. चोरट्यांनी त्यांचे कृष्णाई मेडिकल फोडून त्यामधील 20 हजार रुपयांचा लॅपटॉप, 5700 रुपयांची रक्‍कम व 570 रुपयांचा बॉडी स्प्रे चोरून नेला. तसेच सती येथील अनिल शिवराम कदम यांचे जनरल स्टोअर्स व राजेंद्र रामदास चव्हाण यांचे भाजी दुकान फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या हाताला काहीच लागले नाही. चोरीची घटना उघड होताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपासासाठी श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे करीत आहेत.