Wed, Jan 29, 2020 22:29होमपेज › Konkan › जुगारावर धाड घालणार्‍या पोलिस पथकावरच हल्ल्याचा प्रयत्न!

जुगारावर धाड घालणार्‍या पोलिस पथकावरच हल्ल्याचा प्रयत्न!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वेंगुर्ले : शहर वार्ताहर

शिरोडा-केरवाडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ओरोस पोलिसांच्या विशेष पथकाने घातलेल्या छाप्यात 21हजार 972  रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अड्ड्यावर धाड घातल्यानंतर पोलिसांवर संशयितांना हल्ला केला. यात पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकारात संशयित फरार झाले. मात्र, सोमवारी या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिरोडा-केरवाडा येथील मैदानाच्या मोकळ्या जागेत अंदरबाहर जुगार सुरू असल्याची माहिती गोपनीय खबर्‍याकडून ओरोस पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पी.एन.पाटील, पोलिस कॉन्स्टेबल एस.पी.प्रभू तेंडोलकर,जे.पी. घोन्साल्वीस, ए. एस. तेली यांनी रविवारी सायंकाळी 3.45 वा.धाड टाकली.

यावेळी घटनास्थळी भालचंद्र परब, प्रवीण मसुरकर, प्रकाश न्हावेलकर, नंदू परब ,आप्पा साळगावकर  या पाचजणांची चौकशी सुरू असताना तेथील आजूबाजूला असलेल्या अज्ञात पाच ते सहा इसमांनी हातात काठ्या घेवून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांना सोडवण्यासाठी  शिवीगाळ करत हातातील काठ्यांनी पोलिसांवरच हल्ला करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या डोक्याला तसेच उजव्या हाताला दुखापत झाली. या सर्व प्रकारचा फायदा घेत ताब्यात घेतलेले पाचही संशयित फरारी झाले.

दरम्यान फरारी झालेल्या पाचही संशयितांना वेंगुर्ले पोलिसांनी सकाळी  ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 अ नुसार कारवाई केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी करत आहेत.

 

Tags : Vengurla, Vengurla news, police, suspects attacked, 


  •