Tue, Jun 25, 2019 21:56होमपेज › Konkan › देशाची सुरक्षा नागरिकांच्याच हाती

देशाची सुरक्षा नागरिकांच्याच हाती

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:12PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

देशाच्या बाह्यसुरक्षेपेक्षा अंतर्गत सुरक्षा आज महत्त्वाची ठरत आहे. सीमेवरच्या सुरक्षेसाठी जवान तैनात आहेत. ते आपली भूमिका व्यवस्थित बजावत आहेत. परंतु, देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. 

येथील गोगटे-जोगळेकर कॉलेजमधील स्वा. विनायक दामोदर सावरकरनगर येथे आयोजित ‘अभाविप’च्या कोकण प्रदेश अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी 5 वाजता झाला.

यावेळी स्वागत समिती अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे, सुनील आंबेकर, अ‍ॅड. श्रीरंग भावे, राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान, अनिकेत ओहाळ, प्रा. मंदार भानुशे, श्रीजित वेलणकर आदी उपस्थित होते. मलुष्टे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.