Tue, Jul 07, 2020 09:21होमपेज › Konkan › कोकण किनारपट्टीवरही ‘ओखी’ वादळाचा धोका

कोकण किनारपट्टीवरही ‘ओखी’ वादळाचा धोका

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 10:28PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

नोव्हेंबर महिन्यात वातावरणाचा नूर बदलल्यानंतर अवकाळी पावसाचा शिडकावा झाला होता. आता कोकण किनारपट्टीला अरबी समुद्रातील ‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका संभवण्याची शक्यता हवामान खात्यातून वर्तवण्यात आली आहे. दि. 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत ‘ओखी’ चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा आरएसएमसी (प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र) यांनी दिला आहे.

इशारा  देण्यात आलेल्या कालावधीत आगामी 48 तासांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून किनारपट्टी भागात पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.  ऐन आंबा हंगामात या वातावरणीय धोक्यामुळे कोकणातील बागायतदार चांग़लेच धास्तावले आहेत.

दरम्यान, आठवडाभरात चांगले तापमान आणि अनुकूल थंडीचा परिणाम कलमांवर चांगला मोहर येऊ लागला असताना चक्रीवादळाच्या संभाव्य धोक्यामुळे बागायतदारांना कृषी विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

‘ओखी’ वादळ किनारपट्टी भागात थडकणार असण्याच्या शक्यतेने मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभागाला सावधगिरीच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत दि. 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) अधिकृत सूचनांची तपासणी करण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे.