Tue, Jul 23, 2019 04:07होमपेज › Konkan › रिफायनरीमुळे संपूर्ण कोकणच उध्वस्त होईल : प्रा. नाटेकर

रिफायनरीमुळे संपूर्ण कोकणच उध्वस्त होईल : प्रा. नाटेकर

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 10:53PMकणकवली : प्रतिनिधी

जैतापूर येथे जनतेचा प्रखर विरोध असुनही जगातील सर्वात मोठा दहा हजार मेगावॅटचा प्रकल्प भूकंप प्रवणक्षेत्रात आणला जात आहे. एक गठ्ठा मते मिळवून सत्तेत येण्यासाठी राजकीय पक्ष वरकरणी प्रकल्पाला विरोध करून तो प्रकल्प आणत आहेत. आता त्याच्या शेजारीच जगातील सर्वात मोठा 6 कोटी टन ग्रीन रिफायनरीचा महाप्रदुषणकारी प्रकल्प नाणार येथे आणला जात आहे. त्यामुळे केवळ नाणार परिसरातच नव्हे तर शासनाच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे कोकणातील सजीव सृष्टीचा र्‍हास होईल, अशी भीती प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्‍त केली.

स्वतंत्र कोकण, वृक्षमित्र सेवा, पेन्शनर्स तथा ज्येष्ठ नागरिक संघटनेची सभा स्वतंत्र कोकण राज्य संघटनेच्या कार्यालयात झाली. यावेळी प्रा.नाटेकर बोलत होते. वाय. जी. राणे, जे. जे. दळवी, सुरेश पाटकर, प्रा. पी. डी. पाटील, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते. प्रा. नाटेकर म्हणाले, अणुउर्जा व रिफायनरी प्रकल्प होवू नये म्हणून अनेकवेळा आंदोलनात सहभागी झालो. हजारो पत्रके वाटली. ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प नाणार येथे 15 हजार एकरात तर गिर्येसडा येथे एक हजार एकरात उभारला जाणार आहे. आखाती देशातून दरवर्षी सहा कोटी टन रिफायनरी जयगड बंदरात आणले जाणार.

2 हजार टन पाईपद्वारे नाणार येथे उतरले जाणार. तर बाकीचे चार हजार टन विजयदुर्ग बंदरात नेवून तेथे दोन महाकाय जहाजात साठवून गिर्ये सडावरील महाकाय टाक्यामध्ये ठेवली जाणार आहे. तेथून गरजेनुसार पाईपद्वारे नाणारला प्रक्रिया केली जाणार आहे. त्यातून निर्माण होणे डिझेल, पेट्रोल, विमानाचे तेल, एलपीजी दुसर्‍या पाईपद्वारे जयगड बंदरात निर्यातीसाठी नेले जाईल. यातून कोकणच्या वाट्याला केवळ प्रदूषणच येणार आहे,असेही ते म्हणाले.