Mon, Aug 19, 2019 07:52होमपेज › Konkan › शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आ. डावखरे

शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आ. डावखरे

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 8:25PMदेवरुख  : प्रतिनिधी

कोकण पदवीधर संघात प्रामाणिकपणे शिक्षणक्षेत्रात चांगले काम सुरु आहे. जे प्रश्‍न आहेत ते प्राधान्याने मी सोडवणार आहे. भाजपचे सरकार न्याय मिळवून देण्यास सक्षम आहे.आपण प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे, अशी ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ.निरंजन डावखरे यांनी दिली.

संगमेश्‍वर तालुका भाजपतर्फे देवरुख येथे आमदारांचे स्वागत करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, पंचायत समिती सदस्या स्मिता बाईत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रुपेश कदम, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये,उपनगराध्यक्ष सुशांत मुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी संस्थाचालकांनी आपल्या विविध मागण्यांची निवेदने आ. डावखरे यांना दिली. मागण्यांमध्ये आकृतीबंध निश्‍चित करणे, शालार्थ पद्धती, शिक्षक पगार, कायम शिक्षक नेमणूका या अशा अनेक कारणांमुळे संस्थाचालक नाराज असल्याचे शिक्षणसंस्था चालकांनी निदर्शनास आणून दिले. शालार्थ प्रक्रियेत अडीच हजारांच्यावर फाईल्स पडून आहेत. मात्र, आर्थिक व्यवहाराने या फाईल हलतात असा थेट आरोपही यावेळी करण्यात आला. ज्यु.कॉलेजलाही शिक्षकांना वेतन नाही, विद्यापीठाच्या कोकण विभाग उपकेद्रांत विद्यार्थ्यांना सोयीसुविधा नाहीत, असे सांगण्यात आले. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना शासनाने जाहीर केलेले पाच लाखांचे विशेष अनुदान पाच वर्षे झाली तरी मिळालेले नाही. याकडे लक्ष पुरवावे, अशा मागण्या संचालकांनी बोलून दाखवल्या. प्रश्‍नांबाबत आपण पाठपुरावा करु, असे आश्‍वासन आ. डावखरे यांनी दिले.