Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Konkan ›  ‘जलयुक्त’मध्ये १०२ गावांचे उपग्रहाद्वारे आराखडे

 ‘जलयुक्त’मध्ये १०२ गावांचे उपग्रहाद्वारे आराखडे

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:22PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईसह जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी प्राधान्याने जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यातील योजनेंतर्गत 102 गावांतील आराखडे उपग्रहाद्वारे करण्यात आले आहेत. यासाठी 37 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजनेत गतवर्षी 47 गावांची निवड करण्यात आली होती. मात्र, यामध्ये निवडण्यात आलेल्या जागा प्रस्तावित केल्यानंतर काही ठिकाणी हे प्रस्ताव व्यर्थ गेले. संबंधितांनी जागा निवडताना भौगोलिक निकष न पाळल्याने अनेक जागांवरील प्रस्ताव प्रत्यक्ष कार्यवाहीत आले नाहीत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेत निवडण्यात आलेल्या गावांची आता उपग्रहाद्वारे निवड करण्यात आली. 

यामध्ये 102 गावांचा समावेश आहे. त्यासाठी 37 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी 23 कोटी रुपये इतका निधी या कामांवर खर्च करण्यात आला. निवडण्यात आलेल्या गावांपैकी टँकरग्रस्त गावांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यासाठी जलयुक्त शिवार योजनेतील कामांचे प्रारंभी  ‘जीओ टॅगिंग’ करण्यात आले होते. टॅगिंग झाल्यानंतर त्यांचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून त्यामध्ये 102 गावे निवडण्यात आली. चालू आर्थिक  वर्षात या योजनांची अंमलबजावणी झाल्यास यंदाच्या उन्हाळ्यात 100 गावे टँकरमुक्त होणार आहेत.