Thu, Jul 18, 2019 12:25होमपेज › Konkan › मिरकरवाडा येथील बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला

मिरकरवाडा येथील बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:55PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मिरकरवाडा येथील मच्छिमारी नौकेवरील शुकवारपासून बेपत्ता असलेल्या खलाशाचा मृतदेह सोमवारी भगवती बंदर जेटीजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आंचल जितूराम चौधरी (21, रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. याबाबत नौका मालक इब्राहीम अब्दुल हमीद होडेकर यांनी शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार आंचल हा होडेकर यांच्या नौकेवर खलाशाचे काम करत होता. शुक्रवार 9 फेब्रुवारी पासून तो बेपत्‍ता होता. याबाबत  होडेकरांनी शहर पोलिसांकडे त्याच्या बेपत्ता  झाल्याची खबर दिली होती. सोमवारी साकाळी 9 वा. सुमारास भगवती बंदर जेटीजवळ पाण्यावर आंचलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मच्छिमारांना दिसून आला. पोलिसांनी याची माहिती देताना त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.