Fri, Jun 05, 2020 20:30होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश, पहिला रूग्ण सापडला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश, पहिला रूग्ण सापडला

Last Updated: Mar 26 2020 7:44PM
सिंधुदुर्ग : पुढारी ऑनलाईन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. १९ मार्चला मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील कोरोना बाधिताशी संपर्क आल्याने कोरोना बाधित झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

या कोरोना बाधीत रूग्‍णाला जिल्हा रुग्णालयामध्ये विलगिकरण कक्षामध्ये ठेवण्यात आल्‍याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.