Fri, Jan 18, 2019 05:09होमपेज › Konkan › ‘मुंबई-गोवा’च्या अन्यायाविरोधातील लढा अर्धवटच राहिला

‘मुंबई-गोवा’च्या अन्यायाविरोधातील लढा अर्धवटच राहिला

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:34PM

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली गावचे माजी सरपंच व शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र कुळ्ये यांचे गुरूवारी  निधन झाले. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील अन्यायाविरोधात ते लढा ते देत होते. त्यांच्या निधनाने हा अन्यायाविरोधातील लढा अर्धवट राहिल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत. राजेंद्र कुळ्ये यांनी आरवली ग्रा. पं. चे सरपंच म्हणून काम पाहिले होते. शिवसेनेचे ते कट्टर कार्यकर्ते होते. आजारी असतानाही मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील अन्यायाविरोधात  आरवलीवासियांनी लढा उभारला होता. त्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

बुधवारी 10 जानेवारी रोजी संबंधित समितीने केलेल्या पाहणी दौर्‍यात आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांची होती. मात्र, यातही त्यांचा अपेक्षाभंग झाला. हा धक्‍का त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या अकाली जाण्याने कुळ्ये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेंद्र कुळ्ये यांच्या निधनाची बातमी समजताच आरवलीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
आमदार सदानंद चव्हाण, जि. प. सदस्य सहदेव बेटकर आदींसह विविध क्षेत्रातील जाणकारांनी नातेवाईकांचे सांत्वन केले. सेनेचा सच्चा कार्यकर्ता हरपल्याची 
भावना आ. चव्हाण यांनी व्यक्‍त केली.