Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Konkan › रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाला अपेक्षित गती 

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाला अपेक्षित गती 

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 9:34PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

3रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरण कामांना वेग आला आहे. चौपदरीकरण प्रकल्प जलद गतीने होण्यासाठी सार्वजनिक बांधकामच्या राष्ट्रीय महामार्ग (दक्षिण) विभागाने अहोरात्र मेहनत घेतली. या विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बनगोसावी यांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशस्तिपत्र देऊन गौरवले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. 475 कि.मी.च्या महामार्गातील 213 कि.मी. लांबीचा मार्ग रत्नागिरी, तर 108 कि.मी.चा मार्ग सिंधुदुर्गातून जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम फारच वेगाने होत आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण, लांजातील काम जोमाने पुढे सरकत आहे. हरकती, अपिलांमुळे काही ठिकाणी काम संथ गतीने सुरू असले तरी रखडलेले नाही.

Tags : Konkan, expected, speed, four, lane, highway,  Ratnagiri, Sindhudurg