Sat, Jan 19, 2019 16:46होमपेज › Konkan › राजापूर सभापतिपदाची निवडणूक २९ जून रोजी

राजापूर सभापतिपदाची निवडणूक २९ जून रोजी

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:39PMराजापूर : प्रतिनिधी

येथील पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार शुक्रवार, 29 जून रोजी पंचायत समितीच्या सभागृहात  विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी राजापूरचे उपविभागीय अधिकारी हे पिठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. दि. 29 जून रोजी सकाळी 10 ते 12  यादरम्यान उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 ते सव्वा दोन या कालावधीत अर्जांची छाननी, 2  वाजून 16 मिनिटे  ते 2 वाजून 25 मिनिटे या कालावधीत उमेदवारांना अर्ज मागे घेेता येतील व त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान, असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत  समितीच्या किसान भवनात सभापती निवडीसाठीची ही विशेष सभा पार पडणार आहे.

राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण बारा सदस्यांपैकी शिवसेनेकडे नऊ तर काँग्रेसकडे एक व राष्ट्रवादीचे दोन असे विरोधकांचे तीन एवढे संख्याबळ आहे. पंचायत समितीवर शिवसेनेची गेली दोन दशके एकहाती सत्ता आहे. राजापूरचे सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये आरक्षित आहे. या पदासाठी सेनेतून अनेकजण इच्छुक आहेत. आता  नेमकी कोणाला संधी दिली जाते, याकडे राजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.