Sun, Feb 23, 2020 04:03होमपेज › Konkan › रिफायनरीचा गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्न!

रिफायनरीचा गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्न!

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:30PM

बुकमार्क करा
देवगड : प्रतिनिधी

रिफायनरी हा प्रकल्प प्रदुषणविरहीत असून विकासाचा  माईलस्टोन ठरणारा आहे.  मात्र, प्रकल्प प्रदुषणकारी आहे असे  गैरसमज पसरविले गेले आहेत. ते दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावरून प्रयत्न करणार, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष  प्रमोद जठार यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

देवगड विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले,  नाणार येथे होवू घतलेला रिफायनरी प्रकल्प हा प्रदुषकारी असल्याबाबत गैरसमज लोकांमध्ये पसरविले गेले आहेत. संघर्ष समितीचे वालम यांनीही या प्रकल्पापासून पर्यावरणाला धोका नाही हे पटवून दिल्यास जागा मोफत देवू, असे आव्हान थेट मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

पर्यावरणाचे संतुलन ठेवून रोजगार निर्मिती करणे हीच भुमिका भाजपाची असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रकल्पाबाबत माहिती लोकांना पटवून द्यावी, प्रकल्पाबाबत असलेल्या शंका, समस्या यांचे निराकरण करावे यासाठी प्रकल्प होणार असलेल्या भागातील जनतेला एकत्रित घेवून माहिती द्यावी व त्यांच्याबरोबर चर्चा करावी, अशी विनंती करणार असल्याचे सांगितले.

आनंदवाडी प्रकल्पाचा शुभारंभ फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसर्‍या आठवड्यात करण्याच्या दृष्टिने नियोजन करण्यात येणार असून याबाबत समन्वय समिती व पतन अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली.या प्रकल्पाचा सभोवताली असणार्‍या इन्फास्ट्रक्चरबाबतही चर्चा करण्यात आली.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा वाढणारा ताण लक्षात घेवून त्यादृष्टीने रस्ता रूंदीकरण, सक्षमीकरण यासाठी आवश्यक निधी आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आनंदवाडी प्रकल्प पूर्णत्वास जावा यासाठी दर पंधरा दिवसांनी समन्वय समिती व अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या प्रकल्पाला चांगली दिशा मिळावी यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या मंडळींनी, मच्छीमार, ग्रामस्थांनी एकत्र येवून हातभार लावावा, असे आवाहन जठार यांनी यावेळी केले. शिरवली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच भक्‍ती जठार यांचा सत्कार करण्यात आला.