Sat, Jul 20, 2019 11:11होमपेज › Konkan › कर्जमाफीच्या यादीत सावळा गोंधळ कायम

कर्जमाफीच्या यादीत सावळा गोंधळ कायम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मिळेल, अशी घोषणा केली असताना  जिल्ह्यात कर्जमाफीधारकांच्या यादीतील सावळा गोंधळ कायम आहे. 

कर्जमाफीच्या लाभासाठी जिल्हा बँकेकडे 61 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.  ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ जाहीर झाल्यानंतर 20 ऑक्टोबरला जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. या शेतकर्‍यांची ‘ग्रीन लिस्ट’ तयार करण्यात आली होती. त्या  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे तर तांत्रिक अडचणी असलेल्या शेतकर्‍यांची पिवळी आणि लाल यादी तयार करण्यात आली  होती. त्यामुळेे या यादीतील शेतकरी कर्जमाफीची रक्‍कम कधी मिळते, याच्या प्रतीक्षेत आहेत. 

शेतकर्‍यांची नावे तपासण्याचे काम जिल्हा बँकेचे प्रधान कार्यालय, तालुका, शाखा कार्यालयात युद्ध पातळीवर सुरू झाले आहे तर खासगी बँकातही ही प्रक्रिया सुरू असून ती अत्यंत किचकट झाली आहे. यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.

... त्यांनाही प्रक्रियेत सामावून घेण्याची तयारी

तांत्रिक चुकांमुळे कुणीही कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, शेवटच्या कर्जदाराला जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. ज्यांना काही कारणास्तव कर्जमाफीच्या मागणीचे अर्ज अद्यापही भरता आले नाहीत, त्यांनाही पुन्हा संधी देऊन या प्रक्रियेत सामावून घेण्याची तयारी शासनाने केली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.