Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Konkan › हॉस्पिटल बदनामीपोटी पालकमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावणार!

हॉस्पिटल बदनामीपोटी पालकमंत्र्यांना कायदेशीर नोटीस बजावणार!

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 10:16PMकुडाळ : प्रतिनिधी 

पडवे येथिल लाईफ टाईम हॉस्पिटलची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून बदनामी करण्यात आली आहे. या बदनामी विरोधात त्यांना येत्या दोन दिवसांत वकीलामार्फत कायदेशीर नोटिस बजावण्यात येणार असल्याचा इशारा खा.नारायण राणे यांनी दिला.

कुडाळ महालक्ष्मी हॉल येथील मेळाव्यानंतर खा.राणे यांनी हाँटेल कोकनट येथे पत्रकार परिषद घेतली. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅक अध्यक्ष सतीतश सावंत,रणजीत देसाई,विकास कुडाळकर,अशोक सावंत,प्रकाश मोर्ये,दिपक नारकर,विशाल परब आदी उपस्थितीत होते.

खा. राणे म्हणाले, आम्ही 27 जुलैला हॉस्पिटलचे उद्घाटन केले. प्रत्यक्षात 28 जुलैपासून रूग्ण सुरू झाले.पुढे तीन दिवसांनी पालकमंत्री केसरकर यांनी प्रेस घेत राणे यांच्या हॉस्पिटलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे असल्याचे सांगितले. मुळात केसरकर तीन दिवसात अस निदान कस काय करू शकतात? त्याचं हे विधान आकसाचे आहे.अशाप्रकारे मी बदनामी सहन करणार नाही. जिल्ह्यात रूग्णाला चांगली सेवा मिळवीत हा आपला हेतू आहे.  

आताच्या सरकारला 4 वषर्ं झाली मात्र विकास कुठेच दिसत नाही. 2014 पूर्वी मी सुरू केलेला एकही प्रकल्प या मंडळींनी पुढे सुरू केला नाही.चिपी विमानतळ 2014 मध्ये पूर्ण झाले पण पालकमंत्री ते सुरू करु शकले नाहीत. ते केवळ बढाया मारत आहेत. सी वर्ल्ड रद्द होणार काय?अशी स्थिती आहे. रेडी बंदर बंद करण्याचे काम पालकमंत्री  केसरकर यांनी केले. दोडामार्ग एमआयडीसी,ओरोस आयटी पार्क हे सर्व बंद केले. एकुणच सर्वच बाबतीत जिल्हा मागे आहे.विकासकामाला पैसा नाही,कामे होत नाहीत,झालीच तर ती दुय्यम दर्जाची होतात.रेशनिंगवर पुरेसं धान्य नाही. तरीही याकडे पालकमंत्री,आमदार यांच्या लक्ष नसल्याचं टीका केली.

महामार्ग चौपदरीकरण प्रश्नाबाबत ठेकेदारशी बोललो तरीही दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास बांधकाम मंत्र्याची भेट घेणारआहे. तरीही काही हालचाल न झाल्यास प्रसंगी रास्ता रोको केला जाईल असा इशारा खा. राणे यांनी दिला.