Wed, Mar 20, 2019 12:53होमपेज › Konkan › जमीन वादातून दोन गटांत हाणामारी

जमीन वादातून दोन गटांत हाणामारी

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:19PMकुडाळ : वार्ताहर

कोचरा रवळनाथवाडी येथे जमीन जागेच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकूण पाच जण गंभीर जखमी झाले. या मारहाणीप्रकरणी रविवारी एका गटातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोचरा-रवळनाथवाडी येथे ही घटना घडली. या दोन्ही गटांत जमीन जागेच्या कारणावरून वाद आहेत. निवती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दिगंबर गोविंद म्हापणकर यांनी निवती पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर रविवारी सकाळी 9.30 वा. पुन्हा मारमारीची घटना वाद असलेल्या जमिनीत घडली.

यावेळी चोरी, मारामारी प्रकरणी आनंद शांताराम नागोळकर, अस्मिता आनंद नागोळकर, उदय शांताराम नागोळकर, उर्मिला उदय नागोळकर, शांताराम विजय नागोळकर, राजाराम वासुदेव केरकर (रा.कोचरा, रवळनाथवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई निवती पोलिसांनी दीपा जाधव यांच्या फिर्यादीनुसार केली. यावेळी जमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करणे, आंबे चोरणे, मारामारी या प्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती निवती पोलिसांनी दिली.

यामध्ये दिगंबर गोविंद म्हापणकर (66), गणपत दिगंबर म्हापणकर (34), उदय शांताराम नागोळकर (54), आनंद शांताराम नागोळकर (51), सौ.अस्मिता आनंद नागोळकर (40) हे जखमी असून यातील आनंद नागोळकर, सौ.अस्मिता नागोळकर,  दिगंबर नागोळकर यांना यात गंभीर दुखापत झाली.