Mon, Jan 21, 2019 02:46होमपेज › Konkan › चौकुळ येथे पर्यटन घराची अज्ञाताकडून तोडफोड

चौकुळ येथे पर्यटन घराची अज्ञाताकडून तोडफोड

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:29PM

बुकमार्क करा

आंबोली : वार्ताहर

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अरुण गावडे यांनी चौकूळ येथे ग्रामीण पर्यटन या संकल्पने अंतर्गत बांधलेले पर्यटन घर बुधवारी अज्ञाताने फोडून घरातील सामनासह घरातील लादीचीही तोड-फोड केली. यामुळे अरुण गावडे यांचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले.

अरुण गावडे यांनी ग्रामीण पर्यटन उपक्रमांतर्गत पर्यटक निवासासाठी  बहुउद्देशीय पर्यटन संस्था,आंबोली-चौकुळ व गेळे या संस्थेच्या माध्यमातून  चौकुळ- नेनेवाडी येथे सर्वे क्रमांक 74 मध्ये घर बांधले आहे. येत्या 2 दिवसात पर्यटकांसाठी हे घर खुले करण्यात येणार होते.  दरम्यान, बुधवारी  चौकुळ गावाचा जत्रोत्सव असल्याने गावडे कुटुंबीय जत्रोत्सवासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञाताने घराचा दरवाजा तोडून आतील काही घरगुती सामााचे नुकसान केले  तसेच घरात   खोल्यांमध्ये व बाथरूममध्ये बसवलेल्या फरशांची तोडफोड केली.  कुठल्यातरी द्वेष भावनेतून हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. 

फरशीची तोडफोड करण्याच्या प्रयत्नात अज्ञात व्यक्‍ती जखमी झाली असल्याची शक्यता आहे. कारण घरात रक्‍ताचे डाग पसरले आहेत. गुरुवारी सकाळी अरुण गावडे हे घरी आले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार  आला. त्यांनी या घटनेची माहिती आंबोली पोलिसांना दिल्यावर पो.हे.कॉ.विश्वास सावंत व गुरुदास तेली यांनी घराची पाहणी केली. अरुण गावडे यांनी घरात बसवलेली किमती फरशी,शिल्लक असलेली 15 बॉक्स फरशी,बेसीन,पाईप लाईन, कामगारांचे दोन कटर मशीन,ग्राइंडर,सौर उर्जा संच,पेट्रोल जनरेटर आदी साहित्याची तोड-फोड  केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दोन-तीन वर्षा पूर्वीही श्री. गावडे यांच्या घरात अशीच ही तोड फोड़ करण्यात आली होती. त्यावेळी श्री. गावडे यांनी एका संशयीता बद्दल तक्रार दिली होती.  आताही अरुण गावडे यांनी त्याच संशयितावर संशय  व्यक्‍त केला आहे. तो़फोड़ झाल्याची खबर सवत्र ग्रामस्थांनी पाहणी केली. घरफोड़ी चा तपास पुढील आंबोली पोलिस करत आहेत.