Wed, Jan 16, 2019 23:45होमपेज › Konkan › रत्नागिरीत ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळला

रत्नागिरीत ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळला

Published On: Sep 01 2018 9:18PM | Last Updated: Sep 01 2018 9:18PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सकाळी घरातून बाहेर पडलेल्या ९ वर्षीय मुलाचा मृतदेह शेजारच्या विहीरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथे घडली. रेहान किरण मयेकर (वय ९, रा.भाटीमिऱ्या) असे या मृत मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान हा आज, शनिवार (दि. १ सष्टेंबर) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. बराच वेळ रेहान घरी न आल्याने घरच्यांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरू केले. दिवसभर परिसरातील नागरिक त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा शोध लागला नाही. अखेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याच्या वडीलांना रेहान याचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळून आला.

या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. रेहान याचा मृतदेह तपासणी करीता जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.