Wed, Feb 20, 2019 09:12होमपेज › Konkan › कासव संवर्धन चळवळ रुजायला हवी : भाऊ काटदरे

कासव संवर्धन चळवळ रुजायला हवी : भाऊ काटदरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली  : प्रतिनिधी

समुद्रकिनारी राहणार्‍या स्थानिकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सुटला तर समुद्र कासवाच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन आपोआप होईल. आंजर्लेसारखी ही चळवळ कोकणातील प्रत्येक समुद्रकिनारी रुजणे आवश्यक आहे, असे मत सह्याद्री मित्रमंडळाचे भाऊ काटदरे यांनी व्यक्‍त केले.

वन विभागातर्फे वनदिनाचे औचित्य साधून आंजर्ले येथील माधवराव खांबेटे प्रशालेच्या सभागृहात ‘सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावर कार्यशाळा झाली. अनेक वर्षांपासून कासव समुद्रकिनारी अंडी घालून निघून जात असे. मात्र, सकाळी समुद्रकिनार्‍यावर येणार्‍या गावकर्‍यांकडून ही अंडी काढून त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जात होता. सह्याद्री मित्रमंडळाने अनेक गावांत जाऊन प्रबोधन केल्यावर हा प्रकार बंद झाला व कासव संवर्धनास गती मिळाली. 

कासव संवर्धन प्रकल्पांमुळे आणि कासव महोत्सवामुळे त्या गावांचा विकास झाला. गावात या निमित्ताने अनेक पर्यटक येऊ लागल्याने रोजगार मिळू लागला. त्यामुळे व्यावसायिकांचेही पाठबळ 
मोहिमेला मिळाल्याचे काटदरे यांनी सांगितले.आंजर्लेचे सरपंच संदेश देवकर म्हणाले की, आम्ही ग्रा.पं.तर्फे आंजर्ले समुद्रकिनारी सँड बाईकसाठी परवानगी दिलेली नाही. कारण आम्हाला त्यापेक्षा कासवे महत्त्वाची आहेत. कासव महोत्सवामुळेच गाव प्रसिद्ध झाले असून गावातील व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे. आंजर्ले येथील किनारी सँड बाईकऐवजी साध्या सायकली उपलब्ध करून दिल्या तर हा व्यवसायही चांगला चालेल. त्यानिमित्ताने शहरात कायम गाडीने फिरणारे पर्यटक समुद्रकिनारी सायकलिंगचा आनंद घेतील.

सकाळी लवकर आणि संध्याकाळी दिवस मावळल्यावर ही पिल्‍ले समुद्रात सोडली जातात. यासाठी फार कमी वेळ लागतो. उर्वरित वेळात पर्यटकांना आंजर्ले गावातील जुनी घरे, सुपारी, नारळाच्या बागा किंवा आंजर्ले येथे झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पॉईंट, बॅकवॉटरची सफर घडवली तर त्याचा फायदाही व्यावसायिकांना होईल, अशी सूचनाही एका पर्यटकाने केली.

Tags : Konkan, Konkan News, Tortoise, Culture, movement, encouraged


  •