Sun, Sep 23, 2018 23:24होमपेज › Konkan › उत्तम खोब्रागडेंच्या घरासमोर रिपब्लिकनचे आंदोलन

उत्तम खोब्रागडेंच्या घरासमोर रिपब्लिकनचे आंदोलन

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:43PM
मुंबई :  प्रतिनिधी 
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्याविरोधात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले. वर्सोवा, सात बंगला येथील खोब्रागडे यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
शिकलेल्या लोकांनीच समाजाला धोका दिला असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्याप्रमाणेच खोब्रागडे यांचे वर्तन असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खोब्रागडे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. रिपब्लिकन पक्षातून काँग्रेसमध्ये गेलेल्या खोब्रागडे यांनी आंबेडकरी चळवळीशी गद्दारी केल्याच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या व खोब्रागडे यांचा पक्षातर्फे निषेध केला. 
यावेळी काकासाहेब खंबाळकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, रमेश पाईकराव, रतन अस्वारे, एन जी भालेराव, ए.आर.अन्सारी, रशिद सय्यद, श्रीमंत तोरणे आदी सहभागी झाले होते. राज्यात सनदी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या खोब्रागडे यांनी निवृत्तीनंतर रिपब्लिकन पक्षात रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता.