Tue, Apr 23, 2019 18:23होमपेज › Konkan › पालकमंत्र्यांनी आधी आरोग्य सुविधा सुधारावी : परशुराम उपरकर

पालकमंत्र्यांनी आधी आरोग्य सुविधा सुधारावी : परशुराम उपरकर

Published On: Sep 13 2018 1:45AM | Last Updated: Sep 12 2018 9:33PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

विमानतळासाठी वेळ घालविण्यापेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील विशेषत: स्वत:च्या सावंतवाडी शहरातील आरोग्य सुविधा आधी सुधारावी. 

विमान उतरण्याचा खटोटोप करण्याऐवजी तेवढी धडपड आरोग्य सेवेसाठी केली असती तर बरे झाले असते, असा टोला मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावला.

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. मनसे एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष  अ‍ॅड.राजू कासकर, अतुल केसरकर, आशिष सुभेदार, विठ्ठल गावडे, हर्षद पाताडे आदी उपस्थित होते.माजी पालकमंत्री नारायण राणे काय किंवा दीपक केसरकर या दोघां पालकमंत्र्यांच्या काळात गणपती बाप्पा खड्यातूनच आणावा लागणार आहे.आजी-माजी पालकमंत्री खडड्डे बुजवू शकलेले नाही, अशी टीका त्यांनी राणे व केसरकर यांच्यावर केली.

चिपी विमानतळासाठी 272 हेक्टर जमीन शेतकर्‍यांकडून 1 कोटी 76  लाख रुपयांना विकत घेतली.  चिपी विमानतळासाठी शेतकर्‍यांच्या पेन्सिल नोंदी जमिनी अल्प दराने घेतल्या. हे शेतकरी नोकर्‍या मिळणार या आशेवर आहेत. परंतु त्यांना  नोकर्‍या नाहीत. सहा हजार अर्ज पडून आहेत.परुळे ग्रामपंचायतीत अर्ज करण्यास पालकमंत्र्यांनी  सांगितले मात्र, प्रत्यक्षात दहा जणांनाच कंत्राटी पद्धतीने नोकर्‍या मिळणार आहेत. विमानाच्या नावावर पालकमंत्र्यांनी खेळखंडोबा सुरू केला आहे. 

विमानाऐवजी रस्त्यावरील खड्डे आधी बुजवावे. धान्य, बाजापेट्या डग्गे वाटले जातात.या गणपतीत त्याचे वाटप का नाही?  खरी गरज यावर्षी होती. सर्वसामान्य महागाईने त्रस्त आहेत, अशी टीका उपरकर यांनी केली. 

राज ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढवणार !

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मनसे पक्षातर्फे निवडणूक लढविणार असल्याबाबत परशुराम उपरकर यांना विचारले असता मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सुतोवाच उपरकर यांनी केले.